गोवा | ११ एप्रिल | प्रभाकर ढगे
(Politics) नामिबियाचे नवे अध्यक्ष डॉ. नेतुम्बो नंदी-नदैतवाह यांनी अमेरिकेचे नाठाळ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पविरोधात जशासतशी भूमिका घेतली आहे. त्यांनी जाहीर केले आहे की, नामिबियामध्ये प्रवेश करणाऱ्या अमेरिकन नागरिकांना यापुढे व्हिसा आवश्यक असेल.
(Politics) पूर्णतः मंजूर व्हिसाशिवाय पकडलेल्या कोणत्याही अमेरिकन नागरिकाला ‘बेकायदेशीर विदेशी’ घोषित केले जाईल. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत आफ्रिकन स्थलांतरितांशी ज्याप्रमाणे वागतात त्याचप्रमाणे वागणूक दिली जाईल.
(Politics) नामिबियामध्ये व्हिसाशिवाय हिरे, सोने, युरेनियम, तांबे आणि इतर खनिजे खाणकाम करणारे ५०० हून अधिक अमेरिकन नागरिक आहेत. त्यांना १ एप्रिलपासून ‘देश सोडण्याचे आदेश’ देण्यात आले आहेत. अन्यथा सक्तीने देशाबाहेर काढण्याचा सज्जड दमही देण्यात आला आहे.
जगातील आघाडीच्या हिरे उत्पादकांपैकी एक असलेल्या नामिबियाने आता त्यांच्या हिऱ्यांच्या खाणींवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. Bravo Namibia ! ही हिंमत आमच्याकडे कधी येणार?
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
