‘पैठणीचा खेळ’ प्रथम क्रमांक मनिषा शेंडे, रेखा कदम आणि ऋतुजा कांबळे
मुंबई | १३ मार्च | गुरुदत्त वाकदेकर
(Mumbai news) जागतिक महिला दिनाच्या निमित्त परेल येथील गणेश क्रीडा मंडळ, टाटा कंपाऊंड येथे ‘स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि संतुलन’ विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वैशाली शेलार यांनी महिलांच्या मानसिक स्वास्थ्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. मंडळाचा हा उपक्रम सातत्याने १८ वर्षे सुरू आहे.
(Mumbai news) महिला घरगुती जबाबदाऱ्या, नोकरी आणि सामाजिक अपेक्षांमध्ये समतोल राखताना मानसिक तणावाला सामोऱ्या जातात. तसेच, हार्मोनल बदल आणि वैयक्तिक नातेसंबंधांचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. डॉ. शेलार यांनी या सर्व मुद्द्यांवर प्रकाश टाकत तणाव व्यवस्थापन आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी प्रभावी उपाय सुचवले.
(Mumbai news) कार्यक्रमाची सुरुवात विजय कक्कर यांच्या मधुर गाण्याने झाली. त्यानंतर प्रतिक्षा पंकज फाटक आणि किरण सत्यप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते डॉ. शेलार यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, त्यावेळी मंचावर गीता चमनम, पुजा केळुस्कर, शुभांगी कदम उपस्थित होत्या.
महिला दिनानिमित्त हळदीकुंकू समारंभानंतर ‘पैठणीचा खेळ’ हा विशेष खेळ आयोजित करण्यात आला. या खेळात प्रथम क्रमांक मनिषा शेंडे, रेखा कदम आणि ऋतुजा कांबळे यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक करीना विश्वकर्मा, रुतिका राणे आणि भारती कांबळे यांनी पटकावला, तर तृतीय क्रमांक विशाखा राणे, किरण मिश्रा आणि काजल जडेजा यांनी मिळवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले, तर रविंद्र पाटील, विक्रांत लाळे आणि किरण जाधव यांनी त्यांना सहकार्य केले. या यशस्वी उपक्रमासाठी गणेश क्रीडा मंडळ, टाटा कंपाऊंड, परेल यांचे प्रमुख पदाधिकारी देवेंद्र केळुस्कर, कमलाकर केळुस्कर, पंकज फाटक, सुनिल सुकाळे, किशोर कदम आणि रोहन चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रेरणादायी उपक्रमातून महिलांना मानसिक सशक्तीकरणाची नवी ऊर्जा मिळाली असून, त्यांच्या आरोग्यविषयक जागरूकतेला चालना मिळाली.
Contents