संगमनेर | ११ फेब्रुवारी | नितीनचंद्र भालेराव
(Education) तालुक्यातील राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी तसेच आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांचा समृध्द कलेचा वारसा असलेल्या हिवरगाव पावसा कला नागरीत जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
(Education) बुधवारी ता.१२ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता संगमनेरचे आ.अमोल खताळ यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. तसेच राजेंद्र ठाकूर गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर, गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड, सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, यशवंत भांगरे विस्ताराधिकारी बीट सारोळे पठार, बाळासाहेब जाधव केंद्रप्रमुख चंदनापुरी, पोलीस पाटील मथाजी पावसे, भाऊराव राहिंज संचालक प्राथमिक शिक्षक बँक, डॉ.विजय पावसे अध्यक्ष तंटामुक्ती समिती, सरस्वती घुले-सहाणे संचालिका प्राथमिक शिक्षक बँक, बाबासाहेब पावसे चेअरमन विविध कार्यकारी सेवा सोसायटी, संजय शेडगे विश्वस्त प्राथमिक शिक्षक विकास मंडळ, गणपत पावसे अध्यक्ष देवगड खंडोबा देवस्थान ट्रस्ट, मीना गाढवे शिंदे विश्वस्त प्राथमिक शिक्षक विकास मंडळ, डॉ.संदीप पावसे चेअरमन जय मल्हार दूध उत्पादक संस्था यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
(Education) अध्ययन, संस्कार व कलाविष्कार या त्रिवेणी संगमातून शालेय जीवन फुलते. विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे गुण स्नेहसंमेलनामध्येच विकसित होत असतात. ‘सांज चिमणपाखरांची’ या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर होणाऱ्या उत्कृष्ट कार्यक्रमांमध्ये लावणी नृत्य, आदिवासी नृत्य, भारूड, कोळीनृत्य, रेकॉर्ड डान्स, नाटीका, राष्ट्रभक्तीपर गीत यासारख्या विविधतेने नटलेल्या उत्कृष्ट कलाविष्काराचे सादरीकरण करण्यात येणार आहे. स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी हिवरगाव पावसा गावातील सर्व संस्था पदाधिकारी, सामाजिक, संस्कृतीक, धार्मिक संघटना, तरुण मित्र मंडळ, पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक सुरेश नगरे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, शिक्षकवृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगाव पावसा यांनी केले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.