public issue | वाढत्या चोऱ्यांच्या प्रकारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात

इसळक - निंबळक ग्रामस्थांची मागणी

उपसंपादक | दिपक शिरसाठ

तरुणांनी जबाबदारीने वागावे : चौधरी

प्रतिनिधी | २८ जानेवारी | अहमदनगर

 

Contents
तरुणांनी जबाबदारीने वागावे : चौधरीप्रतिनिधी | २८ जानेवारी | अहमदनगर(public issue) गस्त घालत असताना सावधगिरी बाळगावी. रात्री अपरात्री कामाच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीत अनेकांना प्रवास करावा लागतो, गैरसमजातून अनावधानाने काही अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे अनोळखी इसमाची खातरजमा करावी, कोणी संशयित आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. युवक-तरुणांनी जबाबदारीने परिस्थीती हाताळल्यास चोरींच्या घटनांना आळा बसेल,  असा विश्वास सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी व्यक्त केला.(public issue) डॉ. दिलीप पवार व उद्योजक अजय लामखडे यांनी निवेदन देऊन गावात बैठकीचे आयोजन करण्याबाबत एपीआय चौधरी यांच्याशी चर्चा केली होती. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत शनिवारी ता. २५ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित बैठक पार पडली. त्यावेळी मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते.इसळक परिसरात काही दिवसांपूर्वी जबरी चोरीची घटना घडली. त्यानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी वाढत्या चोऱ्यांचे सत्र लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी इसळक, निंबळक ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्याकडे केली.(public issue) ग्रामस्थांनी पोलीस अधिकारी चौधरी यांच्या उपस्थितीत दत्त मंदिरात बैठक घेतली. उपस्थित तरुण आणि ग्रामस्थांनी आपली कैफियत सहाय्यक पोलिस निरीक्षक चौधरी यांच्यासमोर मांडली. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी तसेच कुठलीही घटना घडल्यास तातडीने प्रतिसाद द्यावा, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

(public issue) गस्त घालत असताना सावधगिरी बाळगावी. रात्री अपरात्री कामाच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीत अनेकांना प्रवास करावा लागतो, गैरसमजातून अनावधानाने काही अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे अनोळखी इसमाची खातरजमा करावी, कोणी संशयित आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. युवक-तरुणांनी जबाबदारीने परिस्थीती हाताळल्यास चोरींच्या घटनांना आळा बसेल,  असा विश्वास सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी व्यक्त केला.

(public issue) डॉ. दिलीप पवार व उद्योजक अजय लामखडे यांनी निवेदन देऊन गावात बैठकीचे आयोजन करण्याबाबत एपीआय चौधरी यांच्याशी चर्चा केली होती. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत शनिवारी ता. २५ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित बैठक पार पडली. त्यावेळी मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते.

इसळक परिसरात काही दिवसांपूर्वी जबरी चोरीची घटना घडली. त्यानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी वाढत्या चोऱ्यांचे सत्र लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी इसळक, निंबळक ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्याकडे केली.

 

(public issue) ग्रामस्थांनी पोलीस अधिकारी चौधरी यांच्या उपस्थितीत दत्त मंदिरात बैठक घेतली. उपस्थित तरुण आणि ग्रामस्थांनी आपली कैफियत सहाय्यक पोलिस निरीक्षक चौधरी यांच्यासमोर मांडली. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी तसेच कुठलीही घटना घडल्यास तातडीने प्रतिसाद द्यावा, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

बैठकीसाठी सरपंच प्रियंका लामखडे, अरविंद गेरंगे, नाना कोतकर, संजय गेरंगे, बी. डी. कोतकर, घनश्याम म्हस्के, अमोल शिंदे, बाबासाहेब पाडळे, चंदू खामकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महादेव गवळी यांनी सभेचे संयोजन केले.

 

पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी ग्रामसुरक्षा दल पुन्हा सक्रिय करावेत, तसेच काही होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करावेत, अशी मागणी केली.

हेहि वाचा : History | बळीराजा : भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप – संजय सोनवणी


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading