social | नगरपरिषदेच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही होणार – कार्यकारी अभियंता; अरविंद सोनटक्के यांचे उपोषण स्थगित

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

अहमदनगर | २८ जानेवारी | प्रतिनिधी

(social) पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी अरविंद सोनटक्के यांचे २४ जानेवारीपासून सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर मुख्य कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण आज स्थगित करण्यात आले. यासाठी खा. निलेश लंके यांनी मध्यस्थी केली.

  (social) अधिक महिती देताना सोनटक्के यांनी सांगितले, पाथर्डी शहरात नगरपरिषदेच्या ठेकेदाराकडून शेवगाव रोडवरील दर्शन मशिनरी ते जॉगिंग पार्कपर्यंत चुकीच्या व उलट प्रवाह असलेल्या ठिकाणी बेकायदेशिर होत असलेल्या गटार बांधकामाबाबत सा.बां. विभागास प्रत्यक्ष भेटून व पत्रव्यवहार करत माहिती दिली. परंतु साटेलोटे असलेल्या पाथर्डी उपविभागीय सा.बां. कार्यालयाने काहीही दखल घेतली नाही. ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे उद्योग केले. यामुळे ता.२४ पासून अहमदनगर येथील सा.बां विभाग मुख्य कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. २४ ते २७ या चार दिवसात भ्रष्ट अधिकारी यांनी काहीही दखल घेतली नाही. यावर स्थानिक खासदार यांनी संबंधित अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा केली.

   त्यामुळे या विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी बेकायदेशिर काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची उद्यापासून कारवाई करण्यात येईल असे पत्र अरविंद सोनटक्के यांना दिले. त्यामुळे सोनटक्के यांनी आपले उपोषण स्थगित केले असल्याचे सांगितले.

हे ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading