नगर तालुका | २७ जानेवारी | प्रतिनिधी
(education) तालुक्यातील सारोळाबद्दी येथील माऊंट सिनाय कॉन्व्हेंट स्कूलमध्ये देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी सिनाय कॅडेट फोर्सच्या छात्रांनी परेड कमांडर श्रुष्टी पोकळे हिच्या नेतृत्वाखाली नेत्रदिपक संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुख्याध्यापिका जयश्री खरात यांनी देशासाठी प्रार्थना केली.
(education) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुभाष गुंदेचा यांच्या हस्ते या वर्षाचा चँपियन बॅनर व प्रथम क्रमांकाचा चषक किंग डेव्हिड कंपनीचा कंपनी सिनियर अजिंक्य कंठाळे व श्रुष्टी पोकळे यांना प्रदान करण्यात आला. राणी लक्ष्मीबाई कंपनी व छत्रपती शिवाजी कंपनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक चषकाचे मानकरी ठरले. त्याचप्रमाणे या वर्षाचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून साक्षी राठोड व चैतन्य आवारे यांना गौरविण्यात आले.
याप्रसंगी अथर्व शिंदे, आर्वी शिंदे, देवांश फसले, क्रिती उबाळे, प्रांजल शेडाळे, स्वराज इंगळे, ओमकार कुटे, हर्ष विधाते, शिवराज विधाते, उत्कर्ष गोराने, आरोही कराळे, अरीज शेख व नुतन कोहक या विद्यार्थ्यांची समयोचित भाषणे झाली.
प्रमुख पाहूणे गुंदेचा यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्धतेचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाला विद्यालयाचे संस्थापक डॉ. शाम खरात, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उज्वला पंडित यांनी केले तर आभार अर्चना केदार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहा केदारे, सविता पाटोळे, रेणुका बानिया, कविता आढाव, किशोर उबाळे आदींनी परिश्रम घेतले.
हे ही वाचा : history: खोटारडेपणा किती? ‘लोकसत्ता’चा पोस्टमार्टेम !