india news: जवाहरलाल नेहरू स्टेडियममधे सराव शिबिराला सुरुवात; राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS)12 आणि गोव्यातील 2 स्वयंसेवक कर्तव्यपथावर

उपसंपादक | दिपक शिरसाठ

National Service Scheme (NSS) ची स्थापना व सुरूवात सीएसआरडी ॲण्ड आयएसडब्ल्यूआर (CSRD & ISWR) येथे झाली

नवी दिल्ली | १७ जानेवारी | प्रतिनिधी

(india news) प्रजासत्ताकदिनाच्या पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे १२ आणि गोव्यातील दोन असे एकूण १४ स्वयंसेवक कर्तव्यपथावर तसेच जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भरथंडीत कसून सराव करीत आहेत.india news

(india news) राजधानी दिल्ली येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिन मुख्य कार्यक्रमासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएसच्या सराव शिबिराला जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सुरुवात झाली आहे. या सराव शिबिरात देशभरातून राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण २०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. हा एकूण चमु प्रधानमंत्री यांना आणि राष्ट्रपती यांनाही भेटणार आहेत.

india news

राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे National Service Scheme (NSS) ची स्थापना व सुरूवात अहमदनगर तेथील भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेच्या (BPHE society) सीएसआरडी ॲण्ड आयएसडब्ल्यूआर (CSRD & ISWR) येथे झाली. आता ही योजना देशभरातील शिक्षण संस्थांमधे लागू करण्यात आली.

india news
हे शिबीर ता. ३१ जानेवारी पर्यंत चालणार असून दररोज सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे सराव करीत आहेत, अशी माहिती महाराष्ट्रातून कार्यक्रम अधिकारी म्हणून एनएसएसच्या स्वयंसेवकांसह आलेले डॉ. बी.एन. पुरंदरे (कला), श्रीमती एस.जी. गुप्ता (वाणिज्य) व श्रीमती एस.ए. मिठाईवाला (विज्ञान महाविद्यालय), लोनावाळा कॉलेजचे प्राध्यापक डॉ. पवन शिनगारे यांनी दिली.

हे ही वाचा : india news: हिंदूंनी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नदीतील मासे खावेत की नाही? सत्येंद्र पीएस संपादित सनातन धर्माचा आयुर्वेद मांसाहार संदर्भ असलेला 1 ‘औषधी ग्रंथ’ : मांसौषधि

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *