(goa news) प्रगतीशील नेपाळी समाजाच्या (नवीन शक्ती) गोवा राज्यशाखेच्या अध्यक्षपदी ओपेंद्र साही तर सचिवपदी रोशानी पोखरेल यांची निवड करण्यात आली. नेपाळ समाजवादी पार्टीच्या विदेश विभागाचे प्रमुख जी.एस. गुरंग यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारीणीच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांची एकमताने निवड करण्यात आली.
(goa news) गोवा शाखेच्या उपाध्यक्षपदी मनोज थापा, करण श्रीपाली, हरी आगरी, उदया सेर्पाली व माया खडक यांची निवड झाली. सहसचिवपदी रवी सेर्पाली, कोषाध्यपदी केशव आगरी तर प्रवक्तेपदी दुंखू थारू यांची निवड करण्यात आली.
४१ सदस्यीय गोवा राज्य समितीला यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यासाठी भारत प्रवास अधिवेशन आयोजन समितीचे समन्वयक लोकेंद्र सेर्पाली आणि उत्प्रेरक दान बहादूर उपस्थित होते.