Ad image

Rto | ओव्हरलोड वाहनांवर आरटीओचा ‘ॲक्शन प्लॅन’; 6 जूनपासून विशेष तपासणी मोहीम

अहिल्यानगर आरटीओवर विशेष जबाबदारी; बाहेरील पथकेही करणार संयुक्त कारवाई

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ६.६ | रयत समाचार

(Rto) राज्यातील अतिभार (ओव्हरलोड) व अवैध मालवाहतुकीविरोधात परिवहन विभागाने मोठी मोहीम हाती घेतली असून, अहिल्यानगरसह राज्यभरातील आरटीओ कार्यालयांना विशेष तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. ता. ६ ते ११ जून २०२६ या कालावधीत राज्यव्यापी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

(Rto) परिवहन आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, अतिभार वाहतुकीमुळे रस्ते सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत असून अशा वाहनांविरोधात सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे राज्यभरातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना विशेष तपासणी पथके नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

(Rto) या मोहिमेत अहिल्यानगर आरटीओला विशेष जबाबदारी देण्यात आली असून, येथील तपासणी पथकांसोबत यवतमाळ, वर्धा आणि जळगाव येथील अधिकारी व कर्मचारी संयुक्त कारवाईत सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ओव्हरलोड वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
(Rto) तपासणी मोहिमेदरम्यान बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या पथकांसाठी ईचलन मशीन, वाहन तपासणीसाठी आवश्यक साधने, वाहन आणि चालक उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित कार्यालयांना देण्यात आले आहेत. तसेच मोहिमेदरम्यान करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल ता. २२ जून २०२६ पर्यंत परिवहन आयुक्त कार्यालयात सादर करावा लागणार आहे.
परिवहन विभागाच्या या राज्यव्यापी कारवाईमुळे अतिभार आणि अवैध मालवाहतुकीला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात मालवाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading