अहमदनगर | तुषार सोनवणे
येथील प्रसिद्ध विधिज्ञ आणि मोहटा देवस्थानचे विश्वस्त ॲड. विक्रम लक्ष्मण वाडेकर यांची अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत कायदेशीर सल्लागारपदी निवड झाली. संघटनेच्या जिल्हा कार्यकारीणी सदस्यांच्या बैठकीमधे सर्वानुमते कायदेशीर सल्लागारपदी ॲड. वाडेकर यांच्या नावाचा ठराव करून ही निवड करण्यात आली.
ॲड. वाडेकर हे जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांवर कायदेशीर सल्लागार असून अनेक वर्षापासून ते विविध ठिकाणी व्याख्यान तसेच कायदेशीर शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग असतो. निवडीबद्दल ॲड. विक्रम वाडेकर यांनी सांगितले की, हमाल माथाडी यांच्यासाठी मोफत व सदैव सनदशीर मार्गाने तसेच हमाल पंचायत या संस्थेसाठी विविध समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध रहाणार आहे.
ॲड. वाडेकर यांच्या निवडीबद्दल आ. संग्राम जगताप, खा. निलेश लंके, डॉ. सुजय विखे पाटील, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, पद्मश्री पोपट पवार, कॉ. बाबा आरगडे, ऑक्झिलिअम कॉन्व्हेंट पालक संघटना आदींसह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.