सुतार जातीच्या सर्वांगीण विकासासाठी संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

PSX 20240610 191951

मुंबई (प्रतिनिधी) १०.६.२४

राज्यातील सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी समाजाच्या प्रतिनिधींना दिले. शासन सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

श्री क्षेत्र आळंदी येथे २४ डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या सुतार समाज महामेळाव्यात संत भोजलिग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची मागणी सुतार समाजाने मुख्यमंत्र्यांकडे केली होती, या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. याविषयीचे निवेदन आमदार संजय रायमूलकर यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले.

राज्यातील सुतार समाज हा ग्रामीण भागातील बारा बलुतेदारांपैकी एक प्रमुख उद्यमशील समाज आहे. राज्याच्या आर्थिक, सामाजिक विकासात सुतार समाजाने सातत्याने योगदान दिले आहे. महाराष्ट्रतील प्रत्येक समाज घटकाच्या विकास हे राज्य शासनाचे उद्दिष्ट्य आहे. या भूमिकेतून आणि भावनेतूनच सुतार समाजासाठी स्वतंत्र महामंडळ निर्मितीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. येत्या काळात महामंडळाच्या माध्यमातून सुतार समाजातील विद्यार्थ्यांसाठी, माता भगिनींसाठी आणि तरुण उद्योजकांकरिता विविध योजना राबविता येतील. त्यामुळे समाजाच्या मागणीचा सकारात्मक विचार केला आहे, यातून सुतार समाजासाठी विकासाची दिशा मिळू शकेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *