अहमदनगर (प्रतिनिधी) १६.६.२०२४
शरीर म्हणजे परमेश्वराने आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. निरोगी समाज निरोगी व्यक्ती, शांत, समाधानी असो यांच्यासाठी २१ जुन जागतिक योगा दिनानिमित्त महानगरपालिकेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर मित्र मंडळ व नक्षत्र प्राणायाम परिवारच्या वतीने मोफत योग व आरोग्य साधना सप्ताह २१ ते २५ जुन पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये योग, ध्यानधारणा व आरोग्य विषयक तज्ञाचे मार्गदर्शन मिळणार आहे.
शहरातील नक्षत्र लॉन, बुरूडगाव रोड येथे सकाळी ०५.४५ ते ७.४५ पर्यंत होणार आहे. यामध्ये योगविषयक मार्गदर्शक,आरोग्य विषयक मार्गदर्शक मान्यवर देणार आहेत.
ता. २१ जून रोजी आचार्य राहुल ठोकळ (योग तज्ञ), कर्नल सोमेश्वर गायकवाड (एम.डी. मेडिसीन) यांचे शुगर, उच्च रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल यावर व्याख्यान. ता. २२ जून रोजी उदय वाणी (किसान सेवा समिती), डॉ. अनिकेत कटारिया (हृदयरोग तज्ञ) यांचे हृदयरोग कारण व निवारण. ता. २३ जून रोजी आचार्य अतुल आर्य (युवा भारत, पुणे), डॉ. हेमा सेलोत (निसर्गोपचार तज्ञ) यांचे आहार व पंचभौतिक उपचार. ता. २४ जून रोजी प्रा. बाळासाहेब निमसे (पतंजली योग समिती), डॉ. सतीश सोनवणे (कॅन्सर तज्ञ) यांचे कॅन्सर प्रतिबंधक उपाय. ता. २५ जून रोजी विशाल ठोकळ (मनशक्ती प्रशिक्षक), डॉ. सुधा कांकरिया यांचे आनंदी जीवनाची गुरुकिल्ली, राजयोग मेडीटेशन यावर मार्गदर्शन होणार आहे.
समारोपाला खासदार निलेश लंके हे उपस्थित राहणार आहेत. शिबीर संपुर्ण नि:शुल्क आहे. अनमोल अशा या आरोग्य व योगाची महती विशद करणाऱ्या सोहळ्यास आपणही आपल्या कुटुंबिय व मित्र परिवारसह सहभागी व्हावे, असे आवाहन फुलसौंदर यांनी केले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणी अविनाश ठोकळ ९७३०२०५३०८, रघुनाथ केदार ८२८०९९६११, प्रकाश इवळे, मधुकर निकम यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भगवान फुलसौंदर मित्र मंडळ व नक्षत्र प्राणायाम परिवारच्या वतीने करण्यात आले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.