अहमदनगर | प्रतिनिधी | ३०
येथील भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडीच्या वतीने प्रशांत मुथा, पवन गुंदेचा, प्रीतम गुगळे व अमोल कटारिया यांचा सत्कार करण्यात आला. भाजपाच्या विधानसभा कार्यसमितीच्या प्रभारीपदी स्व. खा. दिलीप गांधी समर्थक प्रशांत मुथ्था यांची नियुक्ती झाल्याबद्दल, महेश नागरी पतसंस्थेच्या संचालकपदी पवन गुंदेचा यांची निवड झाल्याबद्दल तसेच प्रीतम गुगळे व अमोल कटारिया यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जैन ओसवाल युवक संघाचे अध्यक्ष प्रतिक बाबेल, भाजपाचे सहचिटणीस गोपाळ वर्मा, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे, सरचिटणीस हर्षल बोरा, उपाध्यक्ष नीरज राठोड, धनेश गांधी, सुजित गुगळे, अभिजीत चंगेडिया, साहिल कटारिया, शुभम गांधी, चेतन गांधी, संचित डुंगरवाल, अमोल कटारिया, प्रीतम गुगळे, पवन गुंदेचा, प्रशांत बुऱ्हाडे, रुपेश वर्मा, लक्ष्मीकांत तिवारी, सुरेश लालबागे, संजय कागल, चेतन कांकरिया आदी उपस्थित होते.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.