मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) २२.६.२०२४
दक्ष फाउंडेशनच्या वतीने महापौर दालनात दादासाहेब फाळके सिने आर्टिस्ट अँड टेक्निशियन अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूडचा दबंग चित्रपट दिग्दर्शक अंजन गोस्वामी, बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठा चित्रपट दिग्दर्शक आणि फाईट मास्टर टीनू वर्मा आणि चित्रपट अभिनेता ठाकूर अनूप सिंग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजक सुरजित सिंग हे दक्ष फाऊंडेशन मर्डर फॉक्स या वेव्ह मालिकेसाठी उपस्थित होते. सदर पुरस्कार सोहळा राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. सुनील कुमार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अंजन गोस्वामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अंजन गोस्वामी बॉलिवूडच्या जगतात ३२ वर्षे काम करत आहेत. अंजन गोस्वामी यांनी वयाच्या १४ व्या वर्षी बाशू चॅटर्जी यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. अकेले हम, हसीना मान जायेगी, चमेली की शादी, वो सात दिन, जल्लाद, डिस्को डान्सर, दलाल, तीसरा कौन अशा चित्रपटांचे मुख्य सहाय्यक आणि सर्जनशील दिग्दर्शक बनून अंजन गोस्वामी यांनी काही काळातच मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले. १०० डेज, गुलामी, मुस्तफा, युगपुरुष, एक सेकंड में जिंदगी बदल जायेगी, पंछी, अग्निसाक्षी, शराबी, कान्ही अशा मोठ्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. एवढेच नाही तर अंजन गोस्वामी यांनी अनेक अल्बमचेही दिग्दर्शनही केले आहे.
बॉलीवूड चित्रपटांव्यतिरिक्त, अंजन गोस्वामी त्यांच्या आप की आवाज फाउंडेशनच्या नावाने सामाजिक कार्य देखील करतात. या फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक गरीब कुटुंबाला धान्य वाटप, शालेय मुलांना वह्या वाटप, मोफत वैद्यकीय शिबिर, गरीब मुलींची लग्ने, विधवांना साड्या वाटप, हिवाळ्यात वृद्धांना ब्लँकेटचे वाटप केले जाते. अशा प्रकारची कामे अंजन गोस्वामी आणि त्यांची धर्मपत्नी अनिता अंजन गोस्वामी करतात. अंजन गोस्वामी बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील असूनही, स्वतःच्या हिताचा विचार न करता गरीब लोकांसाठी नि:स्वार्थपणे उभे राहतात आणि त्यांची सेवा करण्यात आनंद मानतात.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.