अर्बन बँक ‘आर्थिक हिट अँड रन’ आगरवाल प्रकरणात नविन ट्विस्ट; संग्राम कोतकर यांची या प्रकरणात तक्रारच नव्हती !

अहमदनगर | भैरवनाथ वाकळे

काल दिवसभर नगर अर्बन बँक ‘आर्थिक हिट अँड रन’ आगरवाल प्रकरणात निकालावर आलेल्या न्यायाधीशाकडील केसची बदली प्रकरणाची चर्चा सुरू होती. २९१ कोटींपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळ्यातील पिडीत ठेवीदारांनी न्याय्य भुमिकेतून काम करणाऱ्या न्यायाधीश सित्रे यांची बदली करू नये, असे विनंतीपत्र अहमदनगर मुख्य न्यायाधीश एल.व्ही. यार्लगड्डा यांच्याकडे केली आहे. त्यावर न्यायाधीशांनी चौकशी अर्ज घेऊन त्यावर निकाल देतो म्हणाले.

आज त्यामधे मुख्य तक्रारदार राजेंद्र गांधी यांचेही लेखी पत्र घेण्यात आले. लेखी पत्र इनवर्ड करत असताना तेथे ज्यांच्या तक्रारीनुसार सित्रे यांच्याकडून पुण्याचे बिल्डर आगरवाल यांची निकालावर आलेली केस काढून नविन न्यायाधिशांकडे देण्यात आली होती. ते संग्राम कोतकर व त्यांचे कायदेशिर सल्लागार आले. त्यांनीही त्यांच्या म्हणण्याचे पत्र इनवर्ड केले. संग्राम कोतकर यांच्या म्हणण्यानूसार त्यांनी बिल्डर आगरवाल केस संदर्भात तक्रारच केलेली नाही. त्यांची दुसरी तक्रार होती. त्यांनी त्यांचे सर्व पत्र स्वत: उपस्थित राहून दिलेले आहेत. तर फक्त हिच तक्रार त्यांच्या नावे कोणीतरी पोस्टाने पाठवून दिलेली आहे. वैयक्तिक बदनामी व्हावी म्हणुन कोणीतरी खोडसाळपणा केलेला असून याबाबत ते पोलिस स्टेशनलाही तक्रार दाखल करणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *