वनिताविश्व | ११ जुलै | प्रतिनिधी
(World news) गोवा- हैदराबाद इंडिगो फ्लाईटमध्ये वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग आणि अहमदनगरच्या डॉ. सिमरन यांचे प्रशंसनीय कार्य आपणास माहिती पाहिजे. गोवा येथून हैदराबादकडे जाणाऱ्या इंडिगोच्या 6E6973 या विमान प्रवासादरम्यान एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. विमानात असलेल्या एका प्रवाशाच्या पत्नीला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्या महिलेला अस्थमाचा त्रास असूनही तिची तब्येत अधिकच बिघडली. अन्न व साखर न घेतल्यामुळे तिची प्रकृती अधिकच खालावली होती.
(World news) इंडिगोच्या कर्मचार्यांनी तातडीने ऑक्सिजन मास्क व सिलेंडर उपलब्ध करून दिले. मात्र परिस्थिती गंभीर बनत होती. याचवेळी काही अंतरावर बसलेल्या अहमदनगरच्या डॉ. सिमरन हरजितसिंह वधवा यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढे येत संकटग्रस्त महिलेला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी संबंधित महिलेची जीवनसत्त्वे (Vitals) तपासली, तिच्या घाबरलेल्या पतीला धीर दिला व योग्य त्या वैद्यकीय सल्ल्याने महिलेला समजावले. शक्यतो साखरेची पातळी वाढावी, यासाठी त्यांनी ब्लॅक कॉफीमध्ये साखर देण्याचा सल्ला दिला. फक्त १५ मिनिटांत महिलेला स्थैर्य आले, ती पूर्ण शुद्धीत आली आणि हैदराबादला विमानतळावर कोणत्याही मदतीशिवाय चालत उतरली.
(World news) या प्रसंगानंतर इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी व संबंधित महिलेच्या पतीने वारंवार डॉ. सिमरन यांचे आभार मानले. या संपूर्ण घटनेत डॉ. सिमरन यांनी दाखवलेली तात्काळ कृती, शांतता आणि करुणा याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ऐतिहासिक वैभवशाली अहमदनगरची भुमी कर्तृत्ववान महिलांची आहे. याच भूमीत सुलताना चांदबिबी, राष्ट्रमाता जिजाऊ आणि लोकमाता अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या आहेत. डॉ. सिमरन यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे.
हे ही वाचा : Womens Power | वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.