धर्मसंवाद | २४.११ | रयत समाचार
(World news) जगभरात संघर्ष, तणाव आणि तुटलेली नाती यांची चर्चा वाढत असताना, नेटिव्ह म्हणजेच मुळनिवासी अमेरिकन आध्यात्मिक मार्गदर्शक ब्लॅक एल्क यांचे विचार पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण ठरत आहेत. त्यांच्या मते खरी आणि सर्वात पहिली शांतता बाहेरून नव्हे, तर माणसाच्या आतून सुरू होते.
(World news) ब्लॅक एल्क म्हणतात, पहिली शांतता आणि तीच सर्वांत महत्त्वाची. ती आहे जी माणसांच्या आत्म्यात तेव्हा निर्माण होते, जेव्हा त्यांना प्रथमच विश्वाशी असलेले नाते, त्या विश्वातील प्रत्येक शक्तीशी असलेली आपली एकरूपता जाणवते.
(World news) ते पुढे म्हणतात, विश्वाच्या केंद्रस्थानी वास करणारा ‘महान आत्मा’ कुठे दूर नाही, तर तो सर्वत्र आहे. आपल्या प्रत्येकामध्ये आहे, ही जाणीव मानवाला अंतःशांतीचा खरा मार्ग दाखवते.
मानव आणि निसर्ग यांच्यातील नात्याला आध्यात्मिक उंचीवर नेणारे हे विचार आधुनिक समाजासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तणावग्रस्त वातावरणात अंतर्मुख होण्याची, स्वतःला विश्वाच्या एकात्मतेत पाहण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे.
आजच्या काळात मानसिक स्वास्थ्य, पर्यावरणाशी वाढते दुरावे आणि सामाजिक असुरक्षा यांमुळे निर्माण होणाऱ्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ब्लॅक एल्क यांच्या संदेशाला नवीन अर्थ प्राप्त होत आहे. व्यक्तीने स्वतःच्या अस्तित्वात, आत्म्यात आणि त्याच्या विश्वाशी असलेल्या घट्ट नात्यात शांतता शोधली तरच बाह्य जगात खरी शांतता प्रस्थापित होऊ शकते, हा त्यांचा मूलभूत संदेश आहे. माहितीचा मुळसंदर्भ व छायाचित्र योगी हलमन नाथ यांच्या सौजन्याने.
