World news | कांगारू केअर : वडिलांच्या मायेने वाचले लेकरू

विश्ववार्ता | २१ सप्टेंबर | रयत समाचार

(World news) जगभरातील लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आणणारी, हृदय पिळवटून टाकणारी आणि वडिलांच्या निस्वार्थ प्रेमाची जिवंत साक्ष देणारी घटना प्रकाशात आली. वडिलांनी आपल्या अर्भकाला तब्बल दहा महिन्यांपर्यंत छातीशी कवटाळून ठेवून त्याचे प्राण वाचविले.

(World news) नवजात बाळाच्या जन्मानंतरच गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाल्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि वैद्यकीय उपचारांबरोबरच बाळाला ‘कांगारू केअर’ (छातीशी धरून ठेवण्याची पद्धत) देणे आवश्यक होते. साधारणपणे आई ही जबाबदारी पार पाडते. मात्र या प्रसंगी वडिलांनीच ती जबाबदारी स्वीकारली आणि रात्रंदिवस लेकराला आपल्या हृदयाशी चिकटवून ठेवले.

(World news) बाळाला लागणारे उष्ण तापमान, हृदयाची धडधड, श्वासोच्छ्वासाची लय आणि सुरक्षिततेची भावना, हे सर्व त्या वडिलांच्या छातीमधून मिळत राहिले. याच मायेने आणि जिव्हाळ्याने बाळाचे जीवन वाचले.

या अद्वितीय प्रेमकथेने संपूर्ण जगभरात कौतुकाची लाट उसळली होती. सामान्यतः आईला पोषण, माया आणि काळजीचे प्रतिक मानले जाते; मात्र या घटनेने सिद्ध केले की, वडिलांचेही प्रेम तितकेच नि:स्वार्थ, त्यागमय आणि जीवनदायी असते.

एकीकडे वैद्यकीय यंत्रणा उपचार करत होती, तर दुसरीकडे वडिलांच्या स्पर्शाने लेकराला जीवनदान मिळत होते. या नायक वडिलाने खऱ्या अर्थाने पितृत्वाची नवी व्याख्या करून दाखवली आहे.

प्रेमाला लिंगभेद नसतो, आई असो वा वडील त्यांचा स्पर्श, त्यांची माया जीवन वाचवू शकते, ही सत्यघटना ठळक साक्ष ठरली.

Share This Article