मुंबई | ११.१२ | रयत समाचार
(World news) चित्रपट समीक्षक आणि पत्रकारांवर गेल्या काही दिवसांत झालेले लक्ष्यित हल्ले आणि ऑनलाईन त्रासदायक वर्तनाचा फिल्म क्रिटिक्स गिल्डने निषेध केला आहे. या घटना चिंताजनक असून कोणत्याही व्यावसायिकाला आपले काम केल्याबद्दल वैयक्तिक बदनामी सहन करावी लागू नये, असे गिल्डने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
(World news) गिल्डने स्पष्ट केले की, चित्रपट आवडणे किंवा न आवडणे हा प्रेक्षकांचा अधिकार असला तरी त्यासाठी समीक्षकांवर दबाव आणणे किंवा त्यांना धमकावणे चुकीचे आहे. अलीकडे उद्योगातील काही घटकांकडून फिल्म क्रिटिसिझमला कमी लेखण्याची प्रवृत्ती वाढत असून त्यामुळे स्वतंत्र समीक्षा व संपादकीय स्वायत्ततेला धोका निर्माण होत असल्याचे गिल्डने नमूद केले.
(World news) समीक्षकांवर राजकीय किंवा वैयक्तिक पक्षपातीपणाचे आरोप निराधार असल्याचे सांगत, समीक्षकांना त्यांच्या कामासाठी धमकावणे किंवा गप्प बसवण्याचा प्रयत्न लोकशाही मूल्यांवर आघात करणारा असल्याचे गिल्डने म्हटले आहे.
गिल्डने सर्वांनी संयम, आदर आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मान राखावा, तसेच कला, चर्चा आणि टीका यांना सहअस्तित्व मिळावे, असे आवाहन केले.
