नगर तालुका | ८ मार्च | प्रतिनिधी
(Women) तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राधिका प्रभुणे होत्या. यावेळी गावातील कु. प्रियांका जालिंदर झिने येणे राज्य लोकसेवा आयोगाची महसूल सहाय्यक परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल सरपंच प्रभुणे, उपसरपंच मच्छिंद्र झिने, ग्रामपंचायत सदस्य बापू बेरड, सुधीर गायकवाड, मेजर विश्वनाथ गुंड, माजी सरपंच संतोष झिने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
(Women) गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे देखील महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रगती महिला ग्राम संघ येथे अध्यक्ष जयश्री साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला स्वयंसहाय्यता बचतगटांच्या महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यशस्वी महिलांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सचिव रूपाली शिंदे, कोषाध्यक्ष शरीफा शेख, समूह मार्गदर्शक मुसरफ सय्यद यांनी सहाय्य केले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.