जालना | २१ फेब्रुवारी | प्रतिनिधी
(Women) आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांच्यामुळे सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहत आहे, मात्र यांच्या प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. यांना सामजिक सुरक्षा द्यावी. किमान वेतन द्यावे, शासकिय कर्मचारी दर्जा द्यावा. केंद्र सरकारने २०१८ पासून १ रूपयासुद्धा मोबदला वाढ केलेली नाही, त्यामूळे येणाऱ्या काळात केन्द्र सरकारविरोधात तीव्र लढा उभारू. महाराष्ट्र शासनाने कंत्राटी कर्मचारीचा दर्जा केन्द्र सरकारकडे पाठवला आहे, तो मंजुर करावा. यासाठी संघर्ष तीव्र करावा लागेल. पेन्शन मिळाली पाहिजे, आपल्या हक्कासाठीचा लढा तीव्र करावा, असे आवाहन आयटक महाराष्ट्र राज्याध्यक्ष कॉ. राजू देसले यांनी केले. आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जालना जिल्हा शाखेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
(Women) प्रारंभी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी आयटक प्रणित आशा व गटप्रवर्तक संघटनेचे राज्याध्यक्ष काॅ. प्रा. राजू देसले, भाकपचे जिल्हाध्यक्ष काॅ. देविदास जिगे, सचिव काॅ. प्रल्हाद पडूळ, भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य महादेव खुडे, काॅ. पद्माकर इंगळे, शालिग्राम रोकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंचावर आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस काॅ. गोविंद आर्दड, अध्यक्ष मीना भोसले आदींची उपस्थिती होती.
(Women) यावेळी बोलतांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य सहसचिव काॅ. प्रा. राम बाहेती म्हणाले, आज सर्व समाज संघटीत होत असतांना त्यांच्या मागण्यांकडे सरकार तातडीने लक्ष देत आहे, मात्र जनतेचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांच्या प्रश्न- मागण्यांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. सर्वात जुनी असलेल्या भाकप या पक्षाचे शताब्दी वर्ष सुरू आहे. या पक्षाच्या आयटक या संघटनेने कामगार, श्रमिकांचे लढे उभारून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. शताब्दी वर्षानिमित्त भाकपतर्फे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांनी आपल्या हक्कासाठी आपला लढा तीव्र करून पक्ष व संघटनेची ताकद सरकारला दाखवून द्यावी, असे आवाहन करतांना माकप व सिटू मधून भाकपमध्ये प्रवेश केलेले लढवय्ये कामगार नेते गोविंद आर्दड यांना बळ देण्यात येईल, असे आश्वासनही प्रा. बाहेती यांनी दिले.
(Women ) यावेळी आयटकचे जिल्हाध्यक्ष काॅ. देविदास जिगे, काॅ.प्रल्हाद पडुळ, शालिग्राम रोकडे, महादेव खुडे, रेखाताई सपकाळ, पद्माकर इंगळे, मंदाताई तिनगोटे आदींची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक करतांना काॅ. गोविंद आर्दड यांनी आपण सीटू संघटनेत विविध पदावर काम केले, मात्र वरिष्ठ नेते मंडळींनी आपल्या कार्याची दखल घेतली नाही. आपल्या पाठीशी राहिले नाही. भांडवली पक्षात काम करण्यापेक्षा आयटक या संघटनेचा झेंडा खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना सोसे यांनी केले तर आभार मीनाताई भोसले यांनी मानले. यावेळी मंदाताई तिकांडे, दीपक शेळके, सुभाष मोहिते, विजय बोर्डे, प्रभाकर चोरमारे, गजानन पातरफळे, कल्पना आर्दड यांच्यासह आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे पहिले मराठी पुस्तक