कर्जत | २० सप्टेंबर | रयत समाचार
(Women) तालुक्यातील पाटेवाडी येथे आदिवासी समाजातील एका महिलेच्या अंत्यविधीसाठी गावकऱ्यांनी उघड विरोध केला. परिणामी मृतदेह थेट कर्जत तहसीलदार कार्यालयात आणावा लागला, असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे ॲड. अरूण जाधव यांनी दिली.
(Women) गावकऱ्यांचा विरोध म्हणजे स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनीही आदिवासी समाजाचा अपमान असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीने या अमानवी घटनेचा तीव्र निषेध केला आहे. “मृत्यूनंतरदेखील जर सन्मान नाकारला जात असेल, तर हा अन्याय प्रशासनाने तातडीने थांबवावा,” अशी मागणी ॲड. अरुण जाधव यांनी केली.
(Women) प्रशासनाने जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.