मुंबई | १ ऑक्टोबर | गुरुदत्त वाकदेकर
‘प्रत्येक व्यक्तीत काहीना काही गुण असतात फक्त ते ओळखले पाहिजे, स्वतःतील कलागुणांना ओळखून संधी देणे गरजेचे आहे, असे मत सेंट जोसेफ महाविद्यालयातील मराठी विभागाचे सहाय्यक प्रा. जगदीश संसारे यांनी व्यक्त केले. सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती माणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त Women महिला महाविद्यालयातील माजी विद्यार्थिंनी समिती आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माजी विद्यार्थिनी स्नेहसंमेलन २०२४-२५’ च्या निमित्ताने ‘वेध भविष्याचा’ या मार्गदर्शनपर व्याख्यानाच्या निमित्ताने ते बोलत होते. कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी आभासी पद्धतीने घेण्यात आला.
सुरुवातीला महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आर. जे. माधवी पवार हिने ‘तू बुध्दी दे’ या गीतापासून केली. जीवनात यशस्वी होणे प्रत्येकाच्याच हाती आहे असे नाही, पण प्रयत्नवादी कधी अयशस्वी होत नाहीत. स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे फक्त तो शोधण्याची दृष्टी आणि धैर्य तुमच्या अंगी असायला हवे, असे मत प्रा. जगदिश संसारे यांनी व्यक्त केले.
आज अनेक विद्यार्थिनी शिक्षण, सांस्कृतिक, सामजिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत आणि या यशामागे महाविद्यालयाचे संस्कार आहेत, हे विसरून चालणार नाही, असेही ते पुढे म्हणाले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की आणि माजी विद्यार्थिंनी समितीच्या समन्वयक डॉ. सरिता कासरलकर यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ. रश्मी शेट्ये तुपे, आभार प्रा. सुप्रिया शिंदे यांनी केले. कार्यक्रमात ४० माजी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.