tirupati laddu news: तिरुपती बालाजी मंदिरातील तूपभेसळ निंदनीय कृत्याची चौकशी करून कारवाई करा – इंजी.यश शहा

67 / 100 SEO Score

अहमदनगर | २० सप्टेंबर | प्रतिनिधी

tirupati laddu news  येथील ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया एच.ए.डब्ल्यू.आर. सदस्य तथा प्रथितयश इंजिनिअर यश शहा यांनी तिरुपती बालाजी मंदिरातील तूपभेसळ प्रकरणातील निंदनीय कृत्याची चौकशी करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या गैरकृत्याच्या विरोधात एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर त्वरित चौकशी आणि कारवाईची मागणी त्यांनी लावून धरली आहे. जैन समाज महासंघ अल्पसंख्यांक समिती उपप्रमुख,
अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज आणि जैन दिवाकर मंचचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष यश शहा यांनी ‘X’ वर भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांना पत्र आणि ट्विट केले आहे. त्याचसोबत केंद्रीय अन्न मंत्रालय, आंध्रप्रदेश मुख्यमंत्री, तिरुपती देवस्थान विश्वस्त आणि संबंधित सर्व विभाग, संबंधित अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या त्वरित चौकशी करण्याची आणि तिरुपती मंदिरातील तूप भेसळीच्या निंदनीय कृत्यांविरुद्ध आवश्यक त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.

पुढे इंजी. शहा यांनी म्हटले की, देशभरातील कोट्यवधी हिंदू, जैन, शुद्ध शाकाहारी यांच्या श्रद्धा आणि भावनांचा मोठा विश्वासघात केला आहे. पवित्र तिरुपती मंदिरात लाडू बनवताना वापरल्या जाणाऱ्या तूपात गोमांस आणि फिश ऑइलसह विदेशी फॅट्सची भेसळ केली गेली, हे अलीकडील प्रयोगशाळेच्या अहवालांद्वारे सर्व माध्यमांवर व्हायरल झाल्याचा पुरावा समोर आला आहे. हे घृणास्पद कृत्य म्हणजे मंदिरातील विधींच्या पावित्र्यावर थेट हल्ला आणि हिंदू, जैन धार्मिक श्रद्धांचे उल्लंघन आहे. अशा निंदनीय कृत्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. या गंभीर गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करतो, ज्यात मंदिराच्या कारभारात गुंतलेल्या मंडळाच्या सर्व सदस्यांना तात्काळ बडतर्फ करावे. त्यांची चौकशी करावी.

प्रधानमंत्री यांच्याकडे शहा यांनी मागणी केली आहे की, भाविकांची श्रद्धा कायम रहाण्यासाठी करण्यासाठी आणि भविष्यात अशा अत्याचारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत. हिंदू, जैन धार्मिक प्रथांचा अनादर करणारी ही कृती खपवून घेतली जाणार नाही आणि जबाबदार असलेल्यांवर कायद्याच्या कलमांखाली ईशनिंदेचा गुन्हा दाखल केला पाहिजे.

देशभरातील लाखो भाविक त्यांच्या धार्मिक भावनांचे रक्षण करण्यासाठी आणि आमच्या मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी तुमच्याकडे पहात आहोत. आम्हाला विश्वास आहे की तुमच्या नेतृत्वाखाली आवश्यक ती कार्यवाही तातडीने केली जाईल, असे शहा यांनी सांगितले.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *