student: छात्रभारती विद्यार्थी संघटनेची संगमनेरमधे भव्य संविधान सन्मान रॅली; मुख्याधिकाऱ्याने परवानगी नाकारूनही विद्यार्थी आले रस्त्यावर !

71 / 100 SEO Score

संगमनेर | रजत अवसक

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त छात्रभारती student विद्यार्थी संघटनेच्या वतीने भव्य संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. ऑगस्ट क्रांतीदिन हा भारतातील प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपली हक्क अधिकार अबाधित ठेवण्याचे स्वातंत्र्य दिले, संधीची व दर्जाची समानता दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्ये प्रत्येक नागरिकांमध्ये रुजली पाहिजेत. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन ही तत्वे प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये रुजली पाहिजे, ती अंमलातही आणली पाहिजे. भारतीय संविधानाने इथली जातीव्यवस्था नष्ट करण्याचे मुख्य काम केले. सर्वांना माणूस म्हणून जगण्याचे हक्क देणारे हे प्रमुख साधन, म्हणून देशामध्ये आपण संविधान स्वीकारले.

आजही देशातील कित्येक व्यक्तींना संविधानाचे महत्त्व पटलेले नाही किंवा ते पटवून घेत नाहीत परंतु आपला देश संविधानानुसार चालतो. संविधान सर्वांना माहीत झाले पाहिजे, सर्वांपर्यंत पोहोचले तर आपल्या देशाला पुढे जाण्यापासून कोणीही मागे खेचू शकत नाही.

छात्रभारती विद्यार्थी संघटना, राष्ट्रसेवादल व समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज संगमनेर शासकीय विश्रामगृह – जाणता राजा रोड – नवीन नगर रोड – लिंक रोड – मेन रोड – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरून रॅली नेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये तालुक्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी तसेच अनेक शिक्षक हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. भारतीय संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद, धर्मनिरपेक्षता जिंदाबाद, डरने की क्या बात है, संविधान हमारे साथ है, अशा घोषणा देत रॅलीने शहरात संविधान जागृती केली.PSX 20240809 172717

रॅलीमध्ये जयश्री थोरात, राष्ट्रसेवादलाचे सिताराम राऊत, राजाभाऊ अवसक, छात्रभारतीचे अनिकेत घुले, नईम इनामदार, गोपीनाथ घुले, गणेश जोंधळे, राहुल जऱ्हाड, मोहम्मद कैफ तांबोळी, सुहानी गुंजाळ, कल्याणी हेगडमल, कावेरी आहेर, विशाल शिंदे, तुषार पानसरे, यश कडलक, सुमित खरात, श्रेया शिंदे, अपेक्षा गुंजाळ, ज्ञानेश्वरी सातपुते, पूर्वा शिरसाठ, अनुष्का खरात, प्रवीण डोंगरे, स्वप्नाली वाकचौरे, अभिषेक वैराळ, सोहम घुले, अनिकेत खरात, भरत सोनवणे, कार्तिक घुले, सुयश गाडे, भूमी पराड, आकांक्षा, श्रुती ढेरगे, साक्षी ढेरगे, जमधडे, ईकरा तांबोळी, सेजल आदींसह छात्रभारतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीमध्ये साधारण दोन हजार पेक्षा जास्त नागरिक सहभागी होते.PSX 20240809 172800

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त संविधान सन्मान रॅलीसाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी छात्रभारती रॅली यांना नोटीस दिली. रॅलीच्या समारोपाला जागा उपलब्ध करून दिली नाही. भाषणे करायला नगरपालिकेची जागा आम्ही देऊ शकत नाही. ट्रॅफिकचे कारण देत परवानगी नाकारली. संविधानिक पदावर बसणाऱ्या व्यक्तीकडून संविधान सन्मान रॅलीसाठी जागा उपलब्ध न करून देणे हे अत्यंत निषेधार्थ आहे. पोपटपंची राजकीय कार्यक्रमांना लगेच जागा उपलब्ध होते तर सामाजिक संघटनांना टाळाटाळ केली जाते, ही गंभीर बाब असल्याची सहभागी विद्यार्थी व संविधानप्रेमी नागरिक चर्चा करत होते.PSX 20240809 172639

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा 

Read This : The Right to a Dignified Burial is Being Denied to Tribals in the Municipal Area

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *