Sports: महानगरपालिकेच्या शालेय कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न

67 / 100 SEO Score

अहमदनगर | २३ नोव्हेंबर | प्रतिनिधी

Sports महानगरपालिका, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा नुकतीच जिल्हा क्रीडा संकुल वाडियापार्क येथे उत्साहात संपन्न झाल्या.

स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडाधिकारी प्रियांका खंदारे, विशाल गर्जे, मनपा क्रीडा अधिकारी वेन्सेंट फिलिप्स, क्रीडाशिक्षक राजेंद्र पवार, कराटे असोसिएशनचे राष्ट्रीयपंच अमित बडदे, प्रवीण गीते, सुरज खंडिझोड, अरुणोदय क्रीडा प्रतिष्ठानचे महेश आनंदकर, वैभव देशमुख, मच्छिंद्र साळुंके, टीम टॉपरचे प्रशांत पाटोळे, सुरज गुंजाळ, आदित्य क्षीरसागर, साबिल सय्यद, राम हरदे, धर्मा घोरपडे, सरफराज सय्यद यांच्या हस्ते झाले.

स्पर्धेसाठी दि इंडियन पॉवर मार्शलआर्ट असोसिएशनचे ग्रँडमास्टर संजय आनंदकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जालना टीमचे पंच नसिर सय्यद, जुनेद खान, सागर भाले, दीपक मगरे, अशरद सय्यद यांनी पंच म्हणून काम पाहिले.
स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. विजेत्या खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी अहमदनगर संघात निवड झाली.

Leave a Comment