अहमदनगर |२७ ऑगस्ट | रयत समाचार
(Sports) राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ता. २९ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय, अहमदनगर ऑलिंपिक असोसिएशन, अहमदनगर जिल्हा पॉवर लिफ्टिंग संघटना तसेच विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य क्रीडारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
(Sports) रॅली जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क येथून सकाळी ठीक ७:३० वाजता सुरुवात होणार असून रॅलीदरम्यान खेळाडूंनी शहरात विविध खेळांचे प्रात्यक्षिक सादर करून क्रीडाविकासाचा संदेश देण्याचे ठरवले आहे.
(Sports) या उपक्रमाबाबत माहिती देताना अहमदनगर जिल्हा पॉवर लिफ्टिंग संघटनेचे प्रतिनिधी डेव्हिड मकासरे म्हणाले, क्रीडा विकास व प्रसारासाठी प्रत्येक खेळाडूने या रॅलीत सहभागी होऊन योगदान द्यावे. क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढवणे ही आपली जबाबदारी आहे.
रॅलीत जिल्ह्यातील नामांकित खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.