अहमदनगर | १४ जुलै | प्रतिनिधी
(Social) संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर ता.१३ जुलै रोजी अक्कलकोट येथे एका हिस्ट्रीशिटर गुन्हेगाराने हल्ला करत त्यांच्या चेहऱ्यावर काळे फासल्याची धक्कादायक घटना घडली. या भ्याड कृत्याचा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड तसेच अन्य समविचारी संघटनांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
(Social) या गुंडगिरीला रोखण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मंगळवार ता.१५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आंदोलन करून निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी आरोपी गुन्हेगारावर आणि त्याच्या समर्थकांवर संघटित गुन्हेगारीच्या कलमांनुसार गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
(Social) या आंदोलनात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडसह सर्व समविचारी संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष इंजि. सुरेश इथापे यांनी केले आहे.
