अहमदनगर | २५ जून | प्रतिनिधी
(Social) २६ जून राजर्षी शाहू महाराज जयंती म्हणजेच सामाजिक न्यायदिनानिमित्त समाजकल्याण विभाग सहायक आयुक्त कार्यालय, भा.पां. हिवाळे शिक्षण संस्थेचे सी.एस.आर.डी समाजकार्य व संशोधन संस्था तसेच भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समता दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.
(Social) दिंडी सकाळी ८:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे अभिवादन, जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहू महाराज पुतळा, माळीवाडा येथील महात्मा जोतीराव पुतळा तसचे मार्केटयार्ड चौकातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून समता दिंडीचा सीएसआरडी येथे समारोप होईल. त्यानंतर सीएसआरडी सभागृह येथे १०.३० वाजता प्रसिध्द संविधान प्रचारक प्रा. सुभाष वारे यांचे राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त प्रविण कोरगंटीवार व सीएसआरडी संचालक डॉ. सुरेश पठारे आणि यांनी दिली.
