रयत समाचार
अहमदनगर | ११.४ | लहू दळवी
(Social) महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
(Social) यावेळी चेअरमन बाबासाहेब मुदगल म्हणाले, महाराष्ट्र राज्याला शाहू-फुले-आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळ उभी करून जनतेच्या हक्कांसाठी लढा उभारला. सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र आणून त्यांनी समाजातील प्रश्न सोडविण्याचे काम केले आणि समतेचा संदेश दिला.
(Social) ‘आसूड’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती सुरू करून त्यांच्या विचारांचा प्रसार समाजात केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मुलींची पहिली शाळा सुरू करण्यासाठी दिलेल्या सहकार्यामुळेच महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम होण्याचा मार्ग खुला झाला, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी व्हाईस चेअरमन कैलास चावरे म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार समाजामध्ये पोहोचविण्याचे कार्य पतसंस्थेच्या माध्यमातून पुढेही सातत्याने केले जाईल.
या अभिवादन कार्यक्रमास व्हाईस चेअरमन कैलास चावरे, ज्येष्ठ संचालक जितेंद्र सारसर, सतीश ताठे, शेखर देशपांडे, विकास गीते, किशोर कानडे, बाळासाहेब गंगेकर, बाळासाहेब पवार, विजय कोतकर, सोमनाथ सोनवणे, बलराज गायकवाड, अजय कांबळे, गुलाब गाडे, संचालिका प्रमिला पवार, कार्यलक्ष्मी संचालक आनंद तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा जयघोष करत अभिवादन करण्यात आले.