Social: स्वयंरोजगार प्रकल्पाअंतर्गत चांगदेव वानखेडे यांच्या पीठगिरणी व्यवसायाचे उदघाटन संपन्न

67 / 100 SEO Score

श्रीरामपूर | २ ऑगस्ट | प्रतिनिधी

Social  दिव्यांग व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी दत्तनगर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात येईल तसेच ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी नियमितपणे आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. दिव्यांगाच्या सामाजिक, आर्थिक व सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या संजय साळवे, वर्षा साळवे यांचे कार्य दिव्यांगासाठी दिपस्तंभासारखे आहे. दिव्यांगासाठी कार्य करणे अत्यंत जिकरीचे असते परंतु त्यांना ते परमभाग्य त्यांना लाभले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी दिली त्यामुळे आता आम्ही तुमची सेवा करणे आमचे प्रथम कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद बांधकाम विभाग माजी सभापती बाबासाहेब दिघे यांनी केले.

अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटनेच्या वतीने स्वयंरोजगार प्रकल्पाअंतर्गत चांगदेव वानखेडे यांच्या पीठगिरणी व्यवसाय प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. उदघाटन कार्यक्रम व दिव्यांग विविध योजना मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी सरपंच सारिका कुंकूलोळ, अपंग सामाजिक विकास संस्थेचे संजय साळवे, सचिव वर्षा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद कुंकूलोळ, लखन कडवे, सुरेश शेवाळे, ग्रामसेवक रुबाब पटेल यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी ग्रामपंचायत ५% निधी, घरकुल योजना,अंत्योदय योजना, आरोग्य सुविधा या समस्या संदर्भात सविस्तर माहिती संजय साळवे यांनी दिली. वर्षा गायकवाड यांनी विविध समस्या संदर्भात दिव्यांगांशी चर्चा करुन संवाद साधला. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी दत्तनगर ग्रामपंचायत मार्फत विशेष प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन दत्तनगर ग्रामपंचायतच्या सरपंच सारिका कुंकूलोळ यांनी दिले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चांगदेव वानखेडे, दत्तनगर शाखेच्या शाखाध्यक्षा विमल जाधव, उपाध्यक्ष महेंद्र दिवे, रंगनाथ पुजारी, सायरा बागवान, मधुसूदन रंधे, वंदना उबाळे, सुनिल संसारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *