नेवासा |८ सप्टेंबर रयत समाचार
(Social) तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या प्रगतीसाठी सचिवांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नेवासा तालुका सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांनी केले. सचिवांची मेहनत आणि कष्ट हेच सोसायटीच्या उन्नतीचे खरे आधार आहेत, यावर त्यांनी भर दिला.
(Social) नेवासा तालुका स्टाफ सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंडित बाबासाहेब खाटीक यांची चेअरमनपदी व पत्रकार विजय खंडागळे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विकास अधिकारी सत्यवान खाटीक होते.
(Social) नूतन पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी तालुका विकास अधिकारी सत्यवान खाटीक यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा बँकेचे ओ.एस. अधिकारी बी.एन. नागपुरे, अधिकारी प्रदीप राऊत, माजी चेअरमन संपत नवले, बाळासाहेब पटारे, संदीप आदमाने, सचिव संघटनेचे अध्यक्ष भारत पाटील, संभाजी चव्हाण, बाळासाहेब दिघे, विठ्ठल खाटीक, बाबासाहेब देशमुख, व्यवस्थापक सुभाष सरोदे, बाळासाहेब गडाख, भगवान आंबिलवादे, सतीश पंडुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत सचिव संघटनेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर शासन पातळीवर न्याय मिळवून दिल्याबद्दल सहाय्यक निबंधक घोडेचोर यांचा अभिनंदनाचा ठराव घेऊन कौतुक करण्यात आले.