बेलापूर | १८ सप्टेंबर | रयत समाचार
(Social) पतसंस्था ही केवळ नफा कमाविण्याचे साधन नसून तळागाळातील समाजाचे सर्वांगीण उन्नतीसाठी सामाजिक जाणिवेतून काम करणारे व्यासपीठ आहे, हे बेलापूर येथील जनसेवा नागरी पतसंस्था आपल्या कार्यातून दाखवून देत आहे. अशा सेवाभावी उपक्रमांचा आदर्श इतरही पतसंस्थांनी घ्यावा, असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व बेलापूरचे माजी सरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले.
(Social) जनसेवा पतसंस्थेच्या वतीने दशक्रिया विधीस्थळावर तब्बल ३.५० लाख रुपये खर्चून १००x६० फूटाचे भव्य पत्र्याचे शेड, किर्तन-प्रवचनासाठी मंचक, ओटा व पत्र्याचे शेड उभारण्यात आले. तसेच ‘प्रवरामाई’ नूतन फलकाचे अनावरण व ज्येष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे लिखित ‘प्रवराकुंड’ या ऐतिहासिक माहितीपर फलकाचे अनावरण सोहळा पार पडला.
(Social) यावेळी बोलताना विष्णुपंत डावरे म्हणाले, ‘प्रवास जनसेवेचा’ या उक्तीला खरं ठरवत जनसेवा पतसंस्थेने सुमारे ३.५० लाख रुपये खर्चून स्मशानभूमीत दहन जागेची उंची वाढविणे, पत्र्याचे शेड उभारणे, अत्यावश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून देणे अशी मोलाची कामगिरी केली. उपेक्षितांच्या अश्रूंना हात घालणारे हे खरे समाजसेवेचे कार्य असून संस्थेचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
कार्यक्रमास जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक सुवालाल लुकंड, प्रकाशचंद्र कोठारी, प्रवीण लुकंड, अमित लुकंड, दिपक वैष्णव, सुवर्णा मुंडलिक, सुरेशचंद्र बांठिया, जिल्हा परिषद सदस्य शरदराव नवले, सत्यमेव जयते ग्रुपचे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई, राधेश्याम आंबिलवादे, महेश कुर्हे, सुपेकर गुरुजी, विशाल आंबेकर, सचिन कणसे, बाबासाहेब काळे, जाकीर शेख, बेलापूर रीलसम्राट ईफान शेख, विलास नागले, बाबुलाल भाई, गणेशभक्त आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजातील उपेक्षित घटकांना दिलासा देणाऱ्या जनसेवा पतसंस्थेच्या कार्याची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.
