Social | डॉ. आंबेडकरांच्या शैक्षणिक वारशासाठी ‘SAVE PES’ हाक; आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सहकार्याचे आवाहन

2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

छत्रपती संभाजीनगर | २५.३ | रयत समाचार

(Social) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक वारशाचे जतन आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी (PES) च्या बळकटीसाठी ‘SAVE PES’ या उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत असून, समाजातील सर्व घटकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(Social) ‘बांधिलकी सोशल फाऊंडेशन’च्या पुढाकारातून आयोजित ICTPES 2026 ही परिषद ता.११ व १२ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.

 (Social) ‘डॉ. बाबसाहेब आंबेडकरांची PES संस्था: भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर आधारित या परिषदेत देशविदेशातील अभ्यासक, संशोधक आणि विचारवंत एकत्र येऊन पीईएसच्या संस्थेच्या कार्याचा आढावा घेणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन आणि समानतेचे जे स्वप्न पाहिले, त्याची मूर्त रूप म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटी होय. मात्र, सध्याच्या काळात संस्थेसमोर विविध आव्हाने उभी ठाकली आहेत. या पार्श्वभूमीवर या परिषदेत सखोल विचारमंथन होऊन ठोस उपाययोजना शोधल्या जाणार आहेत.
या परिषदेमुळे शिक्षण, संशोधन आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांना चालना मिळणार असून, बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच, जागतिक स्तरावर संवाद घडवून आणून पीईएस संस्थेच्या भविष्यासाठी दिशा ठरविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमासाठी सुमारे १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, निधी, संसाधने आणि स्वयंसेवकांच्या स्वरूपात सहकार्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. ‘आपले छोटेसे योगदानही मोठा बदल घडवू शकते, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
निधी स्वरूपातील योगदानासाठी बँक तपशील :
खात्याचे नाव : Bandhilki Social Foundation, Chhatrapati Sambhajinagar.
खाते क्रमांक : 344501010052250.
बँकेचे नाव : Union Bank of India.
शाखा : Chh. Sambhajinagar Main Branch.
IFSC कोड : UBIN0534455.
पॅन : AAGTB1814R.
80G क्रमांक : AAGTB1814RF20261.
देणगीदारांसाठी आयकर विभागाच्या ८० जी अंतर्गत करसवलतीची सुविधाही उपलब्ध असून, इच्छुकांनी या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग बनावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Social

Contents
छत्रपती संभाजीनगर | २५.३ | रयत समाचार(Social) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक वारशाचे जतन आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी (PES) च्या बळकटीसाठी ‘SAVE PES’ या उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत असून, समाजातील सर्व घटकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Social) ‘बांधिलकी सोशल फाऊंडेशन’च्या पुढाकारातून आयोजित ICTPES 2026 ही परिषद ता.११ व १२ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. (Social) ‘डॉ. बाबसाहेब आंबेडकरांची PES संस्था: भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर आधारित या परिषदेत देशविदेशातील अभ्यासक, संशोधक आणि विचारवंत एकत्र येऊन पीईएसच्या संस्थेच्या कार्याचा आढावा घेणार आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन आणि समानतेचे जे स्वप्न पाहिले, त्याची मूर्त रूप म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटी होय. मात्र, सध्याच्या काळात संस्थेसमोर विविध आव्हाने उभी ठाकली आहेत. या पार्श्वभूमीवर या परिषदेत सखोल विचारमंथन होऊन ठोस उपाययोजना शोधल्या जाणार आहेत.या परिषदेमुळे शिक्षण, संशोधन आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांना चालना मिळणार असून, बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच, जागतिक स्तरावर संवाद घडवून आणून पीईएस संस्थेच्या भविष्यासाठी दिशा ठरविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.या उपक्रमासाठी सुमारे १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, निधी, संसाधने आणि स्वयंसेवकांच्या स्वरूपात सहकार्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. ‘आपले छोटेसे योगदानही मोठा बदल घडवू शकते, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.निधी स्वरूपातील योगदानासाठी बँक तपशील :खात्याचे नाव : Bandhilki Social Foundation, Chhatrapati Sambhajinagar.खाते क्रमांक : 344501010052250.बँकेचे नाव : Union Bank of India.शाखा : Chh. Sambhajinagar Main Branch.IFSC कोड : UBIN0534455.पॅन : AAGTB1814R.80G क्रमांक : AAGTB1814RF20261.देणगीदारांसाठी आयकर विभागाच्या ८० जी अंतर्गत करसवलतीची सुविधाही उपलब्ध असून, इच्छुकांनी या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग बनावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai

Share This Article