समाजसंवाद | २० जुलै | हेरंब कुलकर्णी
प्रिय छगन भुजबळ,
(Social) आज इस्लामपूरचे नामांतर तुम्ही केले. ते खूप सोपे होते पण एक अवघड मागणे मागतो आहे. १८ जुलै १८८० या तारखेचे उत्तरदायित्व तुमच्या ध्यानीमनी ही नसेल. इंग्रज सरकार पुण्यात दारूचे लायसन वाढवण्याचा विचार करत असताना बरोबर १४५ वर्षापूर्वी याच दिवशी १८ जुलै १८८० रोजी सरकारला त्याला विरोध करणारे पत्र महात्मा फुले यांनी ब्रिटिश सरकारला लिहिले होते.
(Social) महात्मा फुले त्या पत्रात म्हणतात : “पुणे येथे दारूचे गुत्ते उघडल्यामुळे लोकांच्या नैतिक अध:पतनाची सर्व प्रकारची बिजे पेरली जात आहेत. त्यामुळे शहराचे आरोग्य सांभाळणे हा ही एक नगरपालिकेचा उद्देश आहे, त्याला बाधा येत आहे. दारूचे व्यसन हे नागरिकांच्या नैतिक आचरणाला बाधा आहे, तसेच त्यांच्या आरोग्यालाही अपायकारक आहे. दारूचे प्रमाण वाढल्याने अनेक कुटुंबांचा संपूर्ण नाश झाला आहे…”
(Social) छगनराव, इतिहास हा चक्राकार रितीने पुन्हा पुन्हा घडत असतो. आज बरोबर १४५ वर्षानंतर तुमचेच सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात दारूची ३२८ दुकाने वाढवत आहे. तुम्ही ज्यांना प्रेरणा मानता त्या महात्मा फुलेंनी जी भूमिका घेतली ती दारू दुकाने वाढवण्याला विरोध करणारी भूमिका त्यांचा सत्तेत असणारा अनुयायी म्हणून तुम्ही घ्याल का…?
ती घ्यावी हीच फुलेंचे स्मरण करून तुम्हाला साकडे घालतो.
– हेरंब कुलकर्णी, दारूबंदी कार्यकर्ते.
अकोले, अहमदनगर (अहिल्यानगर)
हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.