social: अंजनाबाई चव्हाण स्मृतीप्रित्यर्थ 5 झाडे लावून ‘फळझाडे लागवडीसह संवर्धनाचा निर्धार’

चव्हाण कुटुंबीयांचा कौतुकास्पद उपक्रम

उपसंपादक | दिपक शिरसाठ

अहमदनगर | १० डिसेंबर | प्रतिनिधी

(social) आत्मनिर्धार स्वयंसहाय्यता बचतगटाच्या ज्येष्ठ सदस्या अंजनाबाई भागवत चव्हाण यांचे वृद्धापकाळाने बुधवारी ता.१ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी आज शुक्रवारी ता. १० रोजी  इसळक येथे पार पडला. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य निवर्तल्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फळझाडे लावून आणि  झाडांच्या संवर्धनाचा निर्धार करून कृतिशील श्रद्धांजली अर्पण करण्याचा नवा पायंडा चव्हाण कुटुंबीयांनी पाडला. हा उपक्रम समाजाला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. सिद्धिनाथ मेटे महाराज यांनी केले. चव्हाण यांच्या दशक्रियाविधीच्या प्रवचनसेवेत ते बोलत होते.

(social) आत्मनिर्धार फाउंडेशन संचालित पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने आगामी काळात फळझाडे, औषधी वनस्पतींची लागवड आणि संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्या उपक्रमाचा शुभारंभ यानिमित्ताने करण्यात आला. इसळक येथील चव्हाण कुटुंबियांच्या मदतीने या उपक्रमास चालना मिळाली असल्याची माहिती आत्मनिर्धार फाउंडेशनचे महादेव गवळी यांनी दिली.

झाडांची लागवड आणि संवर्धन ही लोकचळवळ व्हावी, त्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक रामदास कोतकर यांनी केले.

(social) यावेळी निंबळक सोसायटीचे चेअरमन भाऊराव गायकवाड, लेखक सचिन चोभे, बाळासाहेब खपके, घनश्याम म्हस्के, पोपटराव गाडगे, संजय म्हस्के आदी मान्यवर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक परिवार उपस्थित होता.
पर्यावरण संवर्धन समितीचे संदीप गेरंगे, ॲड. राहुल ठाणगे, आसाराम लोंढे, राजेंद्र खुंटाळे महेश चव्हाण, विकास चव्हाण, रोहित चव्हाण आदींनी परिश्रम घेतल्याने हा उपक्रम यशस्वी झाला.
social
आत्मनिर्धार स्वयंसहाय्यता बचतगटाच्या ज्येष्ठ सदस्या दिवंगत अंजनाबाई भागवत चव्हाण
अंजनाबाई यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृती चिरकाल स्मरणात राहाव्यात, त्यांनी दिलेल्या परोपकाराची शिकवणीचे अनुकरण करताना चव्हाण कुटुंबीयांनी श्री क्षेत्र लिंगतीर्थ इसळक येथे ५ झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यासाठी झाडांचे पालकत्व घेण्याचा निर्णय घेतला, असल्याची माहिती किरण चव्हाण यांनी दिली. दशक्रिया विधी दरम्यान उपस्थितांच्या हस्ते पेरू, आवळा, चिंच, उंबर, पिंपळ आणि जांभुळाच्या रोपांचे रोपण करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

 

हे हि वाचा :  द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *