परलोकाची चिंता पाश्चात्य जगाने फारशी केलेली दिसत नाही
समाजसंवाद | २४ डिसेंबर | संजय सोनवणी
(Social) नैतिकता ही समाजांतर्गत सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक झालेली एक अपरिहार्य बाब. स्त्री-पुरुष संबंध कसे असावेत, एकमेकांत चोरी करावी की नाही. शत्रु असेल तर त्याची चोरी केलेली चालेल की नाही. स्वटोळीअंतर्गत एखाद्याने खून करणे, त्याची संपत्ती लुटणे न्याय्य कि अन्याय्य? न्याय्य असेल तर कोणत्या स्थितीत आणि अन्याय्य असेल तर कोणत्य स्थितीत? जिंकलेल्या गुलामांचे काय करायचे? जिंकलेल्या धनाचे वाटप कसे करायचे? या बाबतीतही नियमन गरजेचेच होते. कारण त्यावरून होणाऱ्या संघर्षात टोळीअंतर्गतही अव्यवस्था माजत होती.
(Social) आद्य नीतितत्वे व त्यातुनच जन्मलेले आदिम कायदे टोळीअंतर्गत संघर्षाने आपली सुरक्षितता धोक्यात येवू नये म्हणून आवश्यक बनून गेली. राज्य व्यवस्थेचा जन्मही नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठीच झाला. पण आदिम भयाने माणसाची पाठ कधीच सोडली नाही, कारण नित्याने अनुभवायला येणाऱ्या असुरक्षिततेला त्याला कधीच तोडगा सापडला नाही.
मानवी तत्वज्ञानाचा जन्मच मुळी या अनिश्चिततेची कारणे शोधत त्यावर तात्विक उपाय शोधण्यासाठी झाला.
कोणत्याही धर्माचे आदिम तत्वज्ञान हे मृत्यूभोवतीच फिरते, अनिश्चिततेभोवतीच फिरते हा योगायोग नाही. हे जग माया आहे, मिथ्या आहे असे तत्वज्ञान जसे उगवले तसेच भरपुर मजेत जगुन घ्या…स्वर्ग नाही की नरक नाही असेही सांगत जीवनाला आधार देणारे तत्वज्ञ होतेच.
ग्रीक तत्वज्ञ हे नहमीच जडवादी राहिले व भयावर मात करण्यासाठी त्यांनी निसर्गालाच वापरुन घ्यायचे ठरवले. त्याउलट भारतीय तत्वज्ञान हे बव्हंशी परलोकवादी, अध्यात्मवादी व भक्तीवादी राहिले. कोणते तत्वज्ञान श्रेष्ठ हा येथे मुद्दा नसून मानवी जीवनाला भयावर मात करण्यासाठी कसे सामोरे जायचे यासाठी लावल्या गेलेल्या या सोयी होत्या.
कर्ताकरविता परमेश्वरच असल्याने जेही काही घडते ते पुर्वनियोजितच असते हा नियतीवाद थोड्या फार फरकाने जगभर अस्तित्वात आहे. म्हणजे जे घडणार ते अटळ आहे, ते ठरलेले आहे व त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही हे एकदा ठरल्यावर परलोकाची चिंता पाश्चात्य जगाने फारशी केलेली दिसत नाही.
(Social) भारतियांनी पूजा, भक्ती, जप-तप यातून विधीलिखित बदलता येते, मोक्षाचा मार्ग गाठता येतो या श्रद्धेने भयावर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कर्मकांडांची रेलचेल वाढणे स्वाभाविकच होते.

About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.