school:श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ॲड. रामनाथ वाघ जयंती साजरी; पुण्यतिथीनिमित्त बा.ग.टिळक यांना अभिवादन

70 / 100 SEO Score

पाथर्डी | पंकज गुंदेचा

बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच ॲड. रामनाथ वाघ अण्णा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री छत्रपती शिवाजी school विद्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षपद विजय भताने यांनी भुषविले. यावेळी सिद्धी राजळे, आरोही म्हस्के व राजनंदिनी राजळे यांनी भाषणे केली.
अध्यक्षीय भाषणात विजय भताने यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्वातंत्र्याचा लढा तसेच स्वदेशी वापर व त्यांचे कार्य विशद केले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून समाज परिवर्तन घडवण्याचे सामर्थ्य दाखवून दिले त्यांच्या जीवनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली तसेच स्वर्गीय रामनाथजी वाघ यांचा जीवनपट त्यांचे कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले. विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरखनाथ रेपाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन शिवाजी लवांडे, अनुमोदन भागवत आव्हाड यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र वाढेंकर यांनी केले.

FB IMG 1722534748311
ॲड.रामनाथ वाघ

कार्यक्रम यशस्वितेसाठी बरकडे शंकर, पवार सचिन, लवांडे अमोल, अभयसिंह चितळे, विद्या गोबरे, राजश्री दुशिंग, किर्ती भांगरे, मनिषा जाधव, मंगल लवांडे, जयश्री वाघमोडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी संजय गायकवाड, भाऊसाहेब औसेकर, संजय आठरे, संजय शिंदे, प्रशांत अकोलकर आदींनी परिश्रम घेतले.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *