Book Exhibition: महावीर कलादालनात ‘साहित्यनगरी’ ग्रंथप्रदर्शन सुरू; 10 ते 50 टक्के सवलतींसह वाचकांना ग्रंथमेजवानी

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते
  • Book Exhibition

अहमदनगर | रयत समाचार

Book Exhibition: पुण्यातील ‘साहित्यनगरी’च्या वतीने मराठी व इंग्रजी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली असून, विविध प्रकारच्या साहित्यप्रकारांवरील हजारो पुस्तकांचा खजिना वाचकांसाठी खुला झाला आहे. १० ते ५० टक्क्यांपर्यंत आकर्षक सवलती दिल्याने पुस्तकप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे, अशी माहिती संचालक नवनाथ व शिवाजी भाबड यांनी दिली.

(Book Exhibition)अधिक माहिती देताना भाबड म्हणाले, या प्रदर्शनात कथा, कादंबरी, धार्मिक, ऐतिहासिक, बालवाङ्मय, पाककला, आरोग्य, संदर्भग्रंथ, शालेय व स्पर्धा परीक्षांची पुस्तके यांसह विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. प्रसिद्ध लेखकांची लोकप्रिय पुस्तकेही खास किमतीत विक्रीस ठेवण्यात आली आहेत. स्थानिक लेखकांचीही पुस्तके येथे विक्रीस उपलब्ध आहेत.

‘छावा, श्रीमान योगी, ययाती, अपरिपूर्ण, युगंधर, एक होता कार्वर, बुध्दभूषण, मृत्यूंजय, शिवचरित्र, अ‍ॅटोमिक हॅबिट्स, आमचा बाप अन् आम्ही, रिच डॅड पूअर डॅड, रावण, द अल्केमिस्ट, इंड्रस्टेड ट्रेडिंग’ यांसारखी नामांकित पुस्तके वाचकांना विशेष सवलतीत उपलब्ध होत आहेत.

प्रदर्शनस्थळी विविध प्रकाशनांची नवी, चर्चित तसेच क्लासिक पुस्तके मोठ्या प्रमाणावर मांडण्यात आली असून, वाचकांकडून देखील या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

हे प्रदर्शन महावीर कलादालन, माळीवाडा बस स्थानकाजवळ, अहिल्यानगर येथे भरविण्यात आले असून, अधिक माहितीसाठी ‘साहित्यनगरी’चे संचालक शिवाजी भाबड 9096732650 आणि नवनाथ भाबड 9822785801 यांना संपर्क साधावा.

हे हि वाचा: Womens Power | वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी

Share This Article