नेवासा | १० जून | प्रतिनिधी
(Rip news) जिल्ह्यात शिक्षणाची ज्योत चेतवणारे आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवणारे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबईत दुःखद निधन झाले. ते ७० वर्षांचे होेते. ही बातमी संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत वेदनादायी असून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक महान व्यक्तीमत्व काळासाठी पडद्याआड मावळले.
(Rip news) घाडगे साहेबांनी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा नवा आदर्श निर्माण केला. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि सर्वांगीण विकासावर त्यांचा भर होता. त्यांनी शिक्षणक्षेत्रात दिलेले योगदान प्रेरणादायी असून त्यांच्या कार्यातून असंख्य विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत.
(Rip news) त्यांच्या निधनामुळे समाजात एक सच्चा शिक्षक, मार्गदर्शक आणि परिवर्तनाचा वाहक हरपला आहे. रयत समाचार परिवार त्यांच्या जाण्याने शोकाकुल असून, घाडगे कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना. साहेबराव घाडगे पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!

 
			 
                                 
                              
		 
		