देश-विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्येही राष्ट्रध्वज अर्ध्यावर
नवी दिल्ली | २७ डिसेंबर | प्रतिनिधी
(Rip News) भारताचे माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहनसिंह यांच्या निधनाबद्दल भारत सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून १ जानेवारी २०२५ पर्यंत तो पाळला जाईल. या कालावधीत राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत.
(Rip News) डॉ. सिंह यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तसेच, त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी देश-विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्येही राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

Contents
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
Rip doctor !