Rip News: सेवानिवृत्त कृषी अधिकारी ज्ञानेश्वर आगलावे यांचे अपघाती निधन

काल शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आगलावे हे आपल्या दुचाकीवरून शहरातील शनीचौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (होनराव चौक) रस्त्याने जात असताना जैन मंदिरासमोर रस्त्यावर उभ्या असलेल्या पिकअप चालकाने पाठीमागे न बघता अचानक गाडीचा दरवाजा उघडला. त्यामुळे आगलावे यांच्या दुचाकीला दरवाजाचा धक्का लागून ते खाली पडले. त्यात त्यांना गंभीर मार लागला. आजूबाजूच्या सजग नागरिकांनी त्यांना तत्काळ श्रीगोंद्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु गंभीर दुखापत झाल्यामुळे ज्ञानेश्वर आगलावे यांना अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
Leave a comment