नगर तालुका |१७.१० | रयत समाचार
(Rip news) राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डीले (वय ६६) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पहाटे अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ शहरातील साईदीप रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
(Rip news) शिवाज कर्डीले हे अमोल पाटील गाडे, संदीप कोतकर आणि संग्राम जगताप यांचे सासरे होत. ते नगर तालुका, मार्केट कमिटी व जिल्हा राजकारणातील प्रभावी व्यक्ती म्हणून ओळखले जात. त्यांनी अहमदनगर जिल्हा बँक, कृ.उ.बा.स. तसेच राहुरी मतदारसंघाचे आमदार तसेच विविध सामाजिक संस्थांमधून कार्य करताना जनतेचा विश्वास संपादन केला होता.
(Rip news) त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्ती संपल्याची भावना व्यक्त होत आहे. विविध राजकीय, सामाजिक संघटनांकडून शोकसंदेशांचा वर्षाव सुरू असून, त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज सायंकाळी बुऱ्हाणनगर येथे करण्यात येणार आहेत.
शिवाजी कर्डीले यांचे निधनाने नगर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नुकसान आहे, असे मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
आमदार शिवाजी कर्डीले यांची शेवटची ठरली पत्रकार परिषद…! ता. ८ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृहावरील नव्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार शिवाजी कर्डीले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या ३१ हजार कोटींच्या पॅकेज संदर्भात माहिती दिली होती. ही पत्रकार परिषद भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या आग्रहाखातर आयोजित करण्यात आली होती.
या पत्रकार परिषदेत त्यांनी हसतच पत्रकारांना सांगितले होते, “तुमच्याशी बोलून बरं वाटेल म्हणून आलो.” त्यांच्या या सहज, मनमोकळ्या शब्दांनी उपस्थितांना भावूक केले होते. पत्रकारांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली असता त्यांनी “आता बरा आहे” असं सांगितलं होतं. परंतु नियतीला काही वेगळंच मंजूर होते, हीच पत्रकार परिषद त्यांच्या आयुष्यातील शेवटची ठरली, अशी माहिती पत्रकार बंडू पवार यांनी दिली.
प्रसिध्द देवस्थान मिरीवली बाबा यांच्या दर्शनास ते परवाचं येऊन गेले, त्यांची शेवटची भेट होती, अशी माहिती शफी जहागिरदार यांनी दिली.
