पाथर्डी | १८ जुलै | राजेंद्र देवढे
(Rip news) मोहोज देवढे येथील आदर्श गृहिणी, प्रेमळ आई, समंजस पत्नी आणि जबाबदार सूनबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौभाग्यवती आशाताई अतकरे यांना नुकतीच देवाज्ञा झाली. निधन समयी त्यांचे वय ६५ वर्षे होते.
(Rip news) आशाताईंनी एकत्र कुटुंबपद्धतीत राहून वैयक्तिक हितांपेक्षा सामूहिक हिताला प्राधान्य देत नात्यांमध्ये समतोल साधण्याचा आदर्श घालून दिला. त्यांच्या सासूबाई शकुंतला अतकरे यांनी संसारात राहून संन्यस्त वृत्ती जपत कुटुंबात अध्यात्माचा पाया घातला, आणि त्याच मार्गाने आशाताईंनी सन्मानाने आपली भूमिका पार पाडली.
(Rip news) त्यांचा शांत, संयमी आणि हळुवार स्वभाव गावात सर्वांच्या मनात घर करून गेला होता. अशा आदर्श जीवन जगलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने मोहोज देवढे गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पती, तीन कन्या, एक पुत्र, सासूबाई, दीर-जावई, पुतणे असा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर मोहोज देवढे येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अत्यंत शोकमय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामस्थ, नातेवाईक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
