नेवासा | २८ जुलै | प्रतिनिधी
तालुक्यातील जगप्रसिद्ध देवस्थान असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि विद्यमान उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आपले आयुष्य संपविले. आज सोमवारी सकाळी घरी छताला गळफास घेतला. त्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. गेल्या काही दिवसांपासून शनि शिंगणापूर देवस्थान विविध वादामुळे चर्चेत आहे. सहायक कामगार आयुक्त आणि धर्मादाय आयुक्ताकडे सुनावणीही सुरू होती.
