बोधेगाव | २४ सप्टेंबर | मुनवर शेख
reservation news मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंना समर्थन दर्शवण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून बोधेगाव येथील मारूती मंदिर प्रांगणात उपोषणास बसलेले ह.भ.प.परसराम महाराज विखे उपोषणावर ठाम आहेत. त्यांची तब्येत खालावत आहे, तरीदेखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी बोधेगाव परिसरात सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.
बंदला १००% प्रतिसाद
मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेले बोधेगाव हे ५० खेड्यांचे केंद्रबिंदू आहे, जरांगेंच्या आंदोलनाची धग मोठ्या प्रमाणात या परिसरात जाणवत आहे. मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ सोमवारी बोधेगावसह हातगाव, कांबी, लाडजळगाव, मुंगी, बालमटाकळी, चापडगाव परिसरातही कडकडीत बंद पाळण्यात आला. ह.भ.प. विखे यांच्या आंदोलनाला वाढता प्रतिसाद परिसरातुन मिळत आहे. अनेक ग्रामपंचायतींनी पाठींब्याचे पत्र आंदोलनाला दिले.
आरोग्य विभाग, पोलिस प्रशासनाच्या वतीने सलाईन घेण्याचा आग्रह विखे महाराजांना करण्यात आला परंतु जोपर्यंत मनोज दादा सलाईन घेत नाहीत, तोपर्यंत मी देखील सलाईन घेणार नसल्याचे महाराज म्हणाले. वर्षभरापासुन आरक्षणाचे भिजत घोंगडे कायम आहे. आमच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात, असे विखे महाराज म्हणाले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.