अहमदनगर | ४.४ | रयत समाचार
(Religion) ख्रिस्ती धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानला जाणारा मौंदी गुरुवार अहमदनगरमध्ये मोठ्या श्रद्धा आणि भक्तीभावात साजरा करण्यात आला. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसोबत केलेल्या शेवटच्या भोजनाच्या स्मरणार्थ अहमदनगर पहिली मंडळी सी.एन.आय. चर्चमध्ये प्रभुभोजन विधी अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला.
(Religion) यावेळी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित राहून प्रभूच्या प्रेम, त्याग आणि सेवाभावाच्या शिकवणीचे स्मरण केले. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुऊन दाखवलेली नम्रता आणि एकमेकांवर प्रेम करण्याचा दिलेला संदेश यावेळी अधोरेखित करण्यात आला.
(Religion) नाशिक धर्मप्रांताचे मॉडरेटर एपिस्कोपल कॉमेसरी बिशप रा. रेव्ह. रेमसन व्हिक्टर यांनी आपल्या संदेशातून मौदी गुरुवारचे महत्त्व स्पष्ट केले. “प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलेला प्रेम, नम्रता आणि सेवाभावाचा मार्ग प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे. श्रद्धा केवळ शब्दांत न राहता ती आचरणात उतरवणे हाच खरा धर्म आहे,” असे त्यांनी प्रभावीपणे सांगितले.
याच वेळी बिशप रेमसन व्हिक्टर यांच्या हस्ते मंडळीतील नवोदित तरुणांचा दृढीकरण विधीही पार पडला. या विधीद्वारे तरुणांनी आपल्या श्रद्धेची दृढ प्रतिज्ञा करत मूल्याधिष्ठित ख्रिस्ती जीवन जगण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाला प्रिस्ट इन चार्ज रेव्ह. सतीश तोरणे, रेव्ह. डिकन नूतन कांबळे यांच्यासह मंडळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
india news | अहमदनगरमधे शिक्षणाचे 1 ले बीज लावणारी ‘अमेरिकन मराठी मिशनरी’ – कामिल पारखे

