निगडी | २७ मे | गुरूदत्त वाकदेकर
(Pune news) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धांमधून त्यांच्या कार्याचा जागर करत एक सांस्कृतिक पर्व साकारण्यात आले. सरस्वती माध्यमिक विद्यालय, आकुर्डी (पुणे) येथील शिक्षिका, लेखिका आणि समाजमाध्यमांवर सक्रिय व्यक्तिमत्त्व प्रतिमा काळे (खेमनर) यांच्या संकल्पनेतून यंदाही सलग दुसऱ्या वर्षी पाच प्रकारच्या ऑनलाईन स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
(Pune news) स्पर्धांचा व्यापक प्रतिसाद : या स्पर्धांमध्ये वक्तृत्व / व्हिडीओ सादरीकरण, रांगोळी, चित्रकला, लेख लेखन आणि काव्य लेखन यांचा समावेश होता. विशेषत: लेख लेखन आणि काव्य लेखन प्रकारांना भरघोस प्रतिसाद लाभला. देशभरातील विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांपासून ते प्रौढ स्पर्धकांपर्यंत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवण्यात आला.
(Pune news) परीक्षकांचा कसून अभ्यास व न्याय्य निर्णय : प्रत्येक स्पर्धेसाठी नामवंत परीक्षक नेमण्यात आले होते. त्यांनी वेळेत आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून विजेत्यांची नावे जाहीर केली ती अशी- वक्तृत्व : प्रमोद सूर्यवंशी (मुंबई), रांगोळी : सारिका अस्मार (पुणे), चित्रकला : कु. अक्षदा तावरे (पुणे), लेख लेखन : राजश्री मराठे (पुणे), काव्य लेखन : आनंद घायवट (कसारा)
विशेष कौतुक : सर्वच पाच स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवणाऱ्या संजिवनी शिवाजी जगताप यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
