Public issue | लोकाभिमुखतेचा नवा अध्याय : डॉ. सोमनाथ घार्गे यांचे अनुभव, कार्यपद्धती पोलीस दलासाठी दिशादर्शक

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते
  • Lokabhimukh Adhikari
Public issue
डॉ.सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक, अहमदनगर (अहिल्यानगर)

प्रासंगिक | २५ मे | वृत्तवेध विभाग

(Public issue) रायगड पोलीसदलातील शिस्तप्रिय, संवेदनशील आणि तितकाच लोकाभिमुख अधिकारी अशी ओळख निर्माण करणारे रायगडचे पोलीस अधीक्षक डॉ. सोमनाथ घार्गे यांची प्रशासकीय बदली झाली असून त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकपद स्वीकारले. डॉ. घार्गे यांच्या कार्यकाळात रायगड पोलिस दलात ‘स्मार्ट ठाणे’ संकल्पना, सीसीटीएनएस प्रणालीतील आघाडी, आणि सामान्य जनतेसाठी सुलभ पोलीस व्यवहार यासाठी विशेष प्रयत्न झाले. त्यांनी लिहिलेलं ‘प्रज्ञावंत पोलीस’ हे पुस्तक पोलीस दलाला नवदृष्टी देणारे ठरले.

(Public issue) त्यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिरे, वृक्ष लागवड, घोडेस्वारीसारखे उपक्रम, आणि आपत्ती व्यवस्थापनात तत्परता ही सामाजिक जाणिव जोपासणारी कामगिरी सातत्याने पाहायला मिळाली.

विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या स्वराज्याभिषेक सोहळ्यातील शांतता व सुरक्षा व्यवस्थापन त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले.
(Public issue) डॉ. घार्गे यांचा सुलताना चांदबीबींच्या नगरीत नवा अध्याय सुरू करताना त्यांचे अनुभव आणि कार्यपद्धती पोलीस दलासाठी दिशादर्शक ठरतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श पोलीस प्रशासन आणि जनतेमधील विश्वासाच्या दुव्याचे उत्तम उदाहरण म्हणून कायम स्मरणात राहील. मुंबई पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम यांनी डॉ. घार्गे यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक केले.

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *