Public issue | अवसायक गायकवाड यांचा पेढे भरवून सत्कार; नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना 50% रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

अहमदनगर | २७ जून | प्रतिनिधी

वैभवशाली नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत अडकलेल्या ठेवींप्रकरणी ठेवीदारांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. बँकेचे अवसायक गणेश गायकवाड आणि बँक बचाव समिती, ठेवीदार प्रतिनिधींच्या अखंड परिश्रम, चिकाटी, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि तांत्रिक बाबींच्या अंमलबजावणीतून ठेवीदारांना त्यांच्या ठेवींपैकी ५०% रक्कम परत मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. त्यामुळे आज ता.२७ रोजी बँक बचाव समितीच्या वतीने अहमदनगरमधील नगर अर्बन बँक मुख्यालयात गणेश गायकवाड यांचा पेढे भरवून पुष्पगुच्छासह सत्कार करण्यात आला.

संबंधित तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही ठेवीदारांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम जमा होण्यास सुरुवातही झाली. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चिंता आणि अनिश्चिततेत असलेल्या ठेवीदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या महत्त्वपूर्ण टप्प्यावर बँक बचाव समितीचे प्रमुख शिलेदार राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, ॲड. अच्युतराव पिंगळे, मनोज गुंदेचा, राजेंद्र काळे, ऋषीकेश आगरकर, भैरवनाथ वाकळे, विलास कुलकर्णी, दिनकर कुक्कडवाल आदी ठेवीदार प्रतिनिधींनी आवसायक गणेश गायकवाड यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हा निर्णय शक्य झाल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

नगर अर्बन बँकेच्या भविष्यातील स्थैर्याच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वपूर्ण असून उर्वरित रकमेच्या संदर्भातही लवकरच सकारात्मक पाऊले उचलली जातील, अशी आशा ठेवीदारांमध्ये व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *